Delhi Train Cancellations
esakal
दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून, ५ हजारांहून अधिक प्रवाशांना वेळेत रेल्वे स्थानकावर पोहोचता न आल्याने त्यांची ट्रेन सुटल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गांवर निर्बंध लावण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या हालचालींमुळे राजधानीतील राजकीय वातावरणही तापलं आहे.