Gujarat Election: मराठवाड्याचा dashing नेता असता तर आज कॉंग्रेसचा लजिरवाणा पराभव झाला नसता

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांचे निकाल हाती येण्यास सुरुवात
rajeev satav
rajeev satavesakal

Gujarat Assembly Election 2022 Result: गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. पण राजकीय वर्तुळात चर्चा ही काँग्रेसच्या दारुण पराभवाची. गुजरातमध्ये बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे, तर येथे समोर आलेल्या कलांनुसार भाजप सध्या 150 पेक्षी अधिक जागांवर आघाडीवर आहे.

rajeev satav
Tripura Congress : त्रिपुरात काँग्रेसला मोठा झटका; माजी प्रदेशाध्यक्षांसह 5 बड्या नेत्यांचा TMC मध्ये प्रवेश

1990 नंतरची काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. मात्र काँग्रेससाठी एक चांगली बातमी आहे की, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस बहुमत मिळालं आहे. त्यामुळे तिथे काँग्रेस सरकार स्थापन करू शकतो. मात्र गुजरातमध्ये काँग्रेसला कोणता चांगला चेहरा मिळाला नाही की, त्याच्याकडे पाहून मतदार आकर्षीत होतील.

rajeev satav
Congress : गुजरातमध्ये काँग्रेसचा आजवरचा सर्वात दारुण पराभव; 5 मोठी कारणं

हे असतानाच गुजरातमध्ये पक्षाला नेतृत्वाची कमी भासली २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत दिवंगत खासदार राजीव सातव यांनी पक्षाला पडत्या काळात, मोदी लाटेतही चांगल्या स्थितीत पक्षाला ठेवण्याचे काम गुजरात प्रभारी दिवंगत खासदार राजीव सातव यांनी केले. मात्र कोरोनाच्या काळात राजीव सातव यांचे निधन झाले त्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली.

सोनिया गांधी यांच्या जवळचे खासदार म्हणून मल्लिकार्जून खर्गे यांना मानले जाताता तसेच राहुल गांधी यांचे जवळचे सहकारी म्हणून राजीव सातव यांची ओळख होती. २०१७ च्या गुजरात विधानसाभा निवडणूकात राजीव सातव यांनी भाजपला पाणी पाजलं होतं, प्रचारा दरम्यान सातव यांना गुजरात पोलिसांचा मार खावा लागलाय होता. तरीही त्याला नजुमानता सावत यांनी प्रचार चालूच ठेवला होता. त्यांचीच कमी आज काँग्रस पक्षाला जाणवत आहे का असा प्रश्न पडू लागला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com