भारत- झांबिया : गांधींचा वारसा, कौंडांची मैत्री; दोन देशांनी स्थापन केलेली बँक

India Zambia Friendship Beyond Diplomacy भारताने १९६४ मध्येच झांबियाशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. झांबिया भारत यांच्यातले संबंध केवळ राजनैतिक नव्हते तर व्यावहारिकही होते. इंडो झांबिया बँक ही त्याचं उदाहरण आहे.
India Zambia Relations From Gandhi To Kaunda Friendship

India Zambia Relations From Gandhi To Kaunda Friendship

Esakal

Updated on

१९५५मध्ये तेव्हाच्या उत्तर रोडेशियात (सध्याचे झांबिया) ब्रिटिशांविरोधात लढणाऱ्या एका तरुण नेत्याला दोन महिने तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्याच्यावर आरोप होता की राजद्रोही साहित्याचं वितरण केलं होतं. त्यानं जे साहित्य वाटलं होतं त्यात महात्मा गांधी यांनी दिलेला अहिंसेचा संदेश होता. केनेथ कौंडा असं तरुण नेत्याचं नाव होतं. झांबियाचा तो भावी राष्ट्रपती होता. ज्या तुरुंगातील कोठडीत तो होता तिथं गांधींचं नाव होतं. त्याच नावानं झांबियाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com