

ITBP Foundation Day: आयटीबीपी स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान मोदींकडून हिमवीरांच्या शौर्याचे कौतुक
esakal
PM Modi ITBP greetings: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) दलाच्या स्थापना दिनानिमित्त जवानांना शुभेच्छा दिल्या. हिमवीरांचे शौर्य, समर्पण आणि देशासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेचे त्यांनी कौतुक केले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील संदेशात मोदी यांनी म्हटले की, ITBP च्या जवानांनी प्रत्येक आव्हानाचा निर्धाराने सामना केला आहे. त्यांचे शौर्य आणि बलिदान देशासाठी प्रेरणादायी आहे.