Shimoga Dasara Elephant Incident
esakal
बंगळूर : शिमोगा येथे दसरा मिरवणुकीदरम्यान ६५० किलो वजनाची चांदीची अंबारी वाहून नेणाऱ्या ‘सोमन्ना’ हत्तीने अचानक धुमाकूळ (Shimoga Dasara Elephant Incident) घातला. या घटनेत इमारती आणि एका मोटारीचे, दोन दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. हत्तीच्या मार्गातून बाजूला होण्यासाठी नागरिकांची धावपळ उडाली. दरम्यान, हत्तीच्या पाठीवरील अंबारी खाली पडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली.