

CM Yogi Security Duty Ends With Wrestling Triumph as Police Officer Pins Challenger in the Akhara
esakal
उत्तर प्रदेशातील भदोही (संत रविदास नगर) जिल्ह्यातील सोनइचा गावच्या यात्रेत कुस्तीच्या आखाड्यात रंगलेला सामना सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तावरून परतणारे कोईरौना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रमोद यादव अचानक आखाड्यात उतरले. एका पैलवानाने दिलेले ओपन चॅलेंज स्वीकारत यादव यांनी काही मिनिटांत त्याला चितपट केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.