

समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि भाजप नेत्या अपर्णा यादव यांचे पती प्रतीक यादव (वय ३८) यांच्या आकस्मिक निधनावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. बुधवारी सकाळी ही हृदयद्रावक बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या अधिकृत शोकसंदेशातून यादव परिवाराचे सांत्वन केले आहे.