राजघराण्यात वादातून रक्तरंजित थरार, पहिल्या पत्नीवर दुसऱ्या पत्नीने झाडली गोळी

सतना इथं पारसमनिया गढीत गुरुवारी वादातून महिलेनं रायफलमधून गोळी झाडली. यात राजघराण्याच्या सून योगिता सिंह गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.
First Wife Injured in Alleged Royal Family Gunfire Case

First Wife Injured in Alleged Royal Family Gunfire Case

Esakal

Updated on

मध्य प्रदेशातील सतना इथं नागोदच्या राजघराण्यात वादाला रक्तरंजित वळण लागलंय. पारसमनिया गढीत गुरुवारी वादातून महिलेनं रायफलमधून गोळी झाडली. यात राजघराण्याच्या सून योगिता सिंह गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. योगिता सिंह या रुपेंद्र सिंह उर्फ बाबा राजा यांच्या पहिल्या पत्नी आहेत. तर त्यांच्यावर दुसऱ्या पत्नी सुनिताने गोळीबार केलाय. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com