

Lawyer Abuses CJI, Throws Papers During Supreme Court Hearing
Esakal
सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सुनावणीवेळी कागदपत्रं न्यायमूर्तींच्या दिशेनं भिरकावत सरन्यायाधीशांचं नाव घेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाजू मांडण्यासाठी वकील न्यायमूर्तींसमोर उभा असताना त्याने थेट न्यायमूर्तींनाच आदेश देण्यास सुरुवात केली. यानंतर कागदपत्रं फेकत हे सरन्यायाधीशांना द्या असं म्हणत शिवीगाळ केली. वकिल स्वत:च्याच खटल्यात बाजू मांडत होता. याचिकाकर्त्या वकिलाने अर्जातही न्यायमूर्तींना शिवीगाळ केलीय. Supreme Court Drama as Lawyer Misbehaves With Judges