
गुजरातच्या अहमदाबाद शहरात गुरुवारी मोठा विमान अपघात घडला. अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI171 या फ्लाइटचा टेकऑफदरम्यान अपघात झाला. या विमानात 242 प्रवासी व क्रू मेंबर्स प्रवास करत होते, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी सुद्धा प्रवास करत होते. ते लंडनला आपल्या मुलीला भेटण्यासाठी जात होते, दुर्देवाने या विमान अपघातात विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.