IMD weather forecast October 8 heavy rain alert
esakal
IMD Weather Forecast October 8 : देशातील अनेक भागांत मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू असतानाच, काही राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, गुरुवारी (८ ऑक्टोबर) उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, केरळ आणि तामिळनाडूसह १६ राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत ताशी ६० ते ७५ किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज असून, डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.