

Bhagalpur Builder Murder Case
ESakal
एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भागलपूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर केवळ १२ तासांत पोलिसांनी भागलपूरचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक बजरंग कुमार यांच्या हत्येचा छडा लावला आहे. या खळबळजनक हत्येप्रकरणी पीरपैंती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिलोरी गावातील रहिवासी सीमा कुमारी हिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपी महिलेने हत्येमागील हेतू आणि तपशील उघड केला आहे.