रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! मुलाखतीद्वारे होणार उमेदवाराची निवड

Konkan Railway Recruitment 2022
Konkan Railway Recruitment 2022esakal
Summary

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर रेल्वेमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

Konkan Railway Recruitment 2022 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर रेल्वेमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (Konkan Railway Corporation Limited) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. याअंतर्गत उपअभियंता, सहायक अभियंता, प्रकल्प अभियंता (Project Engineer), वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Assistant Engineer) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. दरम्यान, मुलाखतीद्वारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. मुलाखतीची प्रक्रिया आधीच सुरू झाली असून ती 25 मार्च 2022 पर्यंत चालणार आहे. त्यामुळं या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार मुलाखतीस उपस्थित राहू शकतात.

Konkan Railway च्या माहितीनुसार, उपमुख्य अभियंता 01, सहाय्यक अभियंता 02, प्रकल्प अभियंता 02, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक 04 पदांसाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत. दरम्यान, शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर सहाय्यक अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना AICTE द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिलमध्ये 55 टक्के गुण घेऊन B.Tech असणं आवश्यक आहे. तसंच अर्जदार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. अर्जदाराला रेल्वे/मेट्रो/महामार्ग भागात पूल बांधण्याचा किमान 7 वर्षांचा अनुभव असावा.

Konkan Railway Recruitment 2022
प्रसार भारतीमध्ये २५००० हून अधिक पदे रिक्त!

प्रकल्प अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडं अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा एआयसीटीईकडून किमान 55 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त असणं आवश्यक आहे. याशिवाय, अर्जदार भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. उमेदवाराला रेल्वे/महामार्ग भागात पूल बांधण्याच्या कामाचा किमान 6 वर्षांचा अनुभव असावा.

Konkan Railway Recruitment 2022
पंजाब नॅशनल बँकेमध्ये १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

वयोमर्यादा

उपमुख्य अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 62 वर्षे आणि सहायक अभियंता पदासाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 45 वर्षे असावं. याशिवाय प्रकल्प अभियंता पदासाठी वय 45 वर्षे असावं. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत दिली जाईल. त्याच वेळी, या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला https://konkanrailway.com/ भेट देऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com