PNB Recruitment 2022:पंजाब नॅशनल बँकेमध्ये १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PNB Recruitment 2022 for 12th pass | PNB News

पंजाब नॅशनल बँकेमध्ये १२वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

PNB Recruitment 2022, PNB Peon Bharti 2022, Bank Jobs 2022: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) शिपाई पदांसाठी भरतीसाठी (PNB Recruitment 2022)अर्ज मागवले आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार निर्धारित स्वरूपामध्ये अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. (PNB Peon Recruitment 2022)भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे. उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज केला पाहिजे.

भरतीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया 10 मार्च 2022 पासून सुरू झाले. भरतीसाठी जारी केलेल्या अधिसुचनेनुसार एकूण १५ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

हेही वाचा: UGC चा मोठा निर्णय! १२ वी च्या गुणांवरून केंद्रीय विद्यापीठात होणार नाही प्रवेश

PNB Peon Recruitment 2022: वयोमर्यादा

१८ ते २४ वर्ष वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. पण आरक्षणच्या नियामानुसार संबधित कॅटगरीच्या उमेदवारांना यामध्ये सूट देण्यात आली आहे.

PNB Peon Recruitment 2022: शैक्षणिक पात्रता

पीएनबीमध्ये शिपाई पदांसाठी १२ वी पास उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यासोबतच उमेदवारांना इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असले पाहिजेय

PNB Peon Recruitment 2022: असा भरा अर्ज

उमेदवार आपला अर्ज भरून ‘डेप्युटी सर्कल हेड- सपोर्ट, एचआरडी विभाग, पंजाब नॅशनल बँक, सर्कल ऑफिस, बर्दवान, दुसरा मजला, श्री दुर्गा मार्केट, पोलिस लाइन बाजार, जीटी रोड, बर्दवान-713103 या पत्त्यावर स्पीड पोस्ट व डाकमार्फत पाठवू शकता.

Web Title: Pnb Recruitment 2022 Punjab National Bank Is Recruiting For Peon Posts Apply For 12th Pass Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PunjabPNB
go to top