Pakistani Soldiers Killed : बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांवर मोठा हल्ला, आयईडी स्फोटात 10 सैनिक ठार!

BLA’s Deadly IED Attack in Quetta : क्वेटाजवळ मार्गट येथे बीएलएच्या आयईडी हल्ल्यात १० सैनिक ठार; बलुच विद्रोह्यांचा पाकिस्तानी सैन्यावरील हल्ला तीव्र.
Aftermath of BLA’s IED attack in Quetta, Balochistan, targeting Pakistani military convoy, highlighting ongoing insurgency
Aftermath of BLA’s IED attack in Quetta, Balochistan, targeting Pakistani military convoy, highlighting ongoing insurgencyesakal
Updated on

बलुचिस्तानच्या क्वेटा शहराजवळील मार्गट भागात बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात रिमोट-कंट्रोल्ड इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस (आयईडी) चा वापर करून सैन्याचे वाहन उद्ध्वस्त करण्यात आले.

या स्फोटात १० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला. बीएलएने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून बलुच विद्रोह्यांच्या कारवायांचे केंद्र राहिला आहे. पाकिस्तानी सैन्याकडून अद्याप या हल्ल्याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com