Dhruv Rathi: मोठी बातमी! प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या? न्यायालयाने काढले अजामीनपात्र वॉरंट
Dhruv Rathi Defamation Case: सीजेपीच्या आंदोलनासाठी ध्रुव राठी भारतात आला होता. त्या वेळीच त्याच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती. आता न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याने ध्रुव राठीला अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
New Delhi: भारतातील सत्ताधाऱ्यांवर टीकेचे प्रहार करणारा प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठी याच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात दिल्लीतील साकेत न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.