

Jensen Huang returns as NVIDIA CEO
sakal
Santa Clara: सुरवातीला त्यांच्या अफेअरची बातम्या आली, त्यानंतर आणखी एक अफेअर्सची चर्चा सुरू झाली. त्यानंतर पुन्हा एक अफेअर चर्चेत आले. त्यानंतर जगातील एका बलाढ्य कंपनीचा सर्वेसर्वा असलेल्या त्या व्यक्तीला अत्यंत महत्त्वाच्या पदांवर पाणी सोडावे लागले. एवढेच नाही तर आजवर कमावलेली सर्व प्रतिष्ठाही धुळीस मिळाली. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्या व्यक्तीने तितक्याच वेगात कमबॅकही केले. त्या व्यक्तीचे नाव आहे जेन्सेन हुआंग आणि त्या कंपनीचे नाव आहे एनव्हिडिया.