

Nepal education reform
ESakal
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने १००-कलमी सुधारणा योजना सादर केली. शिक्षण सोपे करणे, विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे आणि शाळा व महाविद्यालयांमधून राजकारणाचा प्रभाव दूर करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे, शाळा आणि महाविद्यालयांमधील राजकीय विद्यार्थी संघटनांवर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.