

US Iran war
Esakal
Iran War Update: अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या आशांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. शस्त्रसंधी लागू असतानाच, दोन्ही देशांनी एकमेकांवर पुन्हा नव्याने हल्ले चढवले आहेत. एका बाजूला, अमेरिकन लष्कराने या आठवड्याच्या शेवटी इराणमधील अनेक रडार आणि ड्रोन नियंत्रण केंद्रांवर हल्ले केल्याचे जाहीर केले आहे; तर दुसरीकडे इराणने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करून कुवेत येथील अमेरिकन हवाई तळाला लक्ष्य केले आहे. दोन्ही देश शांतता करारासाठी वाटाघाटींमध्ये व्यस्त असतानाच, हा सर्व घटनाक्रम घडत आहे.