

Psoriasis Increase In Winter : अनेक वेळा, सोरायसिस असलेल्या लोकांना त्वचेची स्थिती बिघडल्याचा अनुभव येतो. परंतु अनेकांना हे माहित नसते की ज्यामुळे रोगात अचानक वाढ होऊ शकते अशा काही गोष्टी ट्रिगर असता - त्यापैकी हिवाळा हे एक कारण आहे.
सोरायसिस काय असतो आणि काही विशिष्ट ट्रिगर्समुळे त्या स्थितीत कशी वाढ होऊ शकते याविषयी कंसल्टंट डर्माटॉलॉजिस्ट डॉ. सुनील घाटे यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
सोरायसिस काय असतो?
सोरायसिस हा एक जुनाट, संसर्गजन्य नसलेला आणि ऑटो-इम्यून रोग आहे ज्यामुळे त्वचेचा दाह होतो. सोरायसिसच्या काही सामान्य लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ उठणे, त्वचेच्या काही भागाचा रंग बदलणे, काही भागात खाज सुटणे, तडे पडणे व तेथे रक्तस्राव होणे यांचा समावेश होऊ शकतो. ही लक्षणे साधारणपणे गुडघे, पाय, हात, कोपर आणि कधीकधी नखे आणि पायाच्या नखांपाशी आढळतात.
सोप्या भाषेत सांगायचे तर, प्रतिकारक यंत्रणा बाह्य परकीय पदार्थ जसे की जीवाणू, जंतू इ. नष्ट करते. परंतू, काही लोकांमध्ये, प्रतिकारक यंत्रणा निरोगी पेशींना बाह्य परकीय पदार्थ समजून त्या नष्ट करण्याची शक्यता असते. यामुळे आग होते आणि त्वचेवर खपली तयार होते, ज्याला सोरायसिस असे म्हणतात.
सोरायसिस हा त्वचेच्या सर्वात सामान्य आजारांपैकी एक आहे ज्याचा अनेक देशांमध्ये प्रादुर्भाव आहे आणि संपूर्ण जगात 100 दशलक्षाहून अधिक लोकांना तो होतो. भारतात, या आजाराचे प्रमाण सुमारे 2% आहे आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये त्याचा दुप्पट पेक्षा अधिक प्रमाणात प्रादुर्भाव असतो.
हिवाळ्यात सोरायसिसमध्ये वाढ का होते?
सोरायसिस असलेल्या लोकांसाठी हिवाळा वेदनादायक आणि त्रासदायक असू शकतो. आर्द्रतेचा अभाव आणि सूर्यप्रकाशाचा कमी संपर्क यासह कोरडे हवामान हे याच्या प्राथमिक कारणांपैकी एक कारण आहे. हिवाळ्यात बहुतेक वेळा, लोक घरामध्ये अधिक वेळ घालवतात, ज्यामुळे त्वचेची असलेली स्थिती खराब होऊ शकते.
शिवाय, कोरड्या हवामानामुळे त्वचेची आर्द्रता कमी होऊ शकते आणि परिणामस्वरूप त्वचेवर खपल्या येऊ शकतात. यामुळे खाज येणारी आणि खपली असलेली त्वचा असलेल्या लोकांची परिस्थिती अधिक बिघडू शकते.
संपूर्ण जगातील, अनेक अभ्यासांमध्ये हे सिद्ध आणि प्रस्थापित झाले आहे की अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या पेशींच्या वाढीमध्ये लक्षणीयरीत्या अडथळा निर्माण होतो ज्यामुळे सोरायसिस बरं होण्यास मदत होते.
उपचाराचे पर्याय आणि खबरदारी
जर एखाद्या व्यक्तीला खोलवर आणि गंभीर सोरायसिस झाला असल्यास किंवा त्रास असलेल्या भागात वेदना होत असल्यास त्या व्यक्तीने जवळच्या त्वचाशास्त्रज्ञची (डर्माटॉलॉजिस्टची) भेट घेण्याची शिफारस केली जाते.
तीव्रता लक्षात घेऊन, त्वचाशास्त्रज्ञ (डर्माटॉलॉजिस्ट) क्रीम, मलम किंवा अगदी नवीन जेनस किनेज (जेएके) इन्हिबिटर सुचविण्याची शक्यता आहे ज्यामुळे दाह कमी होण्यास मदत होऊ शकते आणि त्वचेची स्थिती बिघडण्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.
खबरदारी घेण्याच्या दृष्टीकोनातून, हिवाळ्यात कपडे वापरण्याबद्दल सावधगिरी घेता येऊ शकते कारण लोकर आणि त्यामुळे येणारी खाज यामुळे सोरायसिस असलेल्या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो.
त्वचेवर पुरळ येऊ नये म्हणून मऊ उबदार कपडे वापरण्याचा विचार करा. त्याशिवाय, तणावामुळे सोरायसिस असलेल्या लोकांच्या त्वचेवर खपली तयार होण्यास चालना मिळू शकते, असे समजले जाते.
शांत राहणे आणि रिलॅक्सेशनच्या पद्धतीची माहिती करून घ्या, ज्यामुळे काही प्रमाणात सोरायसिसचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे, त्वचा ओलसर राखण्यासाठी नियमित स्वरूपात त्वचेच्या आर्द्रतेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.