

Don't Ignore Blood in Stool: Key Differences Between Piles and Colon Cancer
esakal
Colon Cancer Signs vs Piles: शौचाच्या वेळी रक्त पडल्यास बहुतांश लोक त्याकडे सामान्य मूळव्याध (Piles) समजून दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच औषधे घेतात. पण, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शौचातून रक्त पडणे हे फक्त मूळव्याधाचे लक्षण नसून कोलन किंवा रेक्टल कॅन्सर (मोठ्या आतड्याचा किंवा गुदद्वाराचा कर्करोग) यांसारख्या गंभीर आजाराचाही संकेत असू शकतो.
कोलन कॅन्सरचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाल्यास उपचाराने रुग्णाला पूर्णपणे बरे करता येते. त्यामुळे मूळव्याध आणि आतड्याच्या कॅन्सरमधील फरक समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.