Jalgaon Lok Sabha Election : अमळनेरला युती, आघाडीत राजकीय शांतता! मतदार संघात युती, आघाडीचा अजून एकही मेळावा नाही

Jalgaon News : जळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघातील "दादा" असलेल्या दोन्ही माजी आमदारांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात दिसत असल्याने अमळनेरात अजूनतरी शांतता आहे.
Shirish Chaudhary, Sahebrao Patil
Shirish Chaudhary, Sahebrao Patil esakal

आर.जे.पाटील : सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : जळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघातील "दादा" असलेल्या दोन्ही माजी आमदारांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात दिसत असल्याने अमळनेरात अजूनतरी शांतता आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे अमळनेरच्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी जिल्ह्यात जोरदार प्रचाराला सुरवात देखील केली आहे. (Jalgaon Lok Sabha Election)

मात्र त्यांच्याच होमपिच वरील माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील तसेच माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अजून तरी त्यांचे पत्ते उघडलेले दिसून येत नाहीत. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी स्वतः २०१९ ची विधानसभा निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढली होती. त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपच्या राज्यातील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध असले, तरी देखील ते स्मिता वाघ यांच्या प्रचारात अजून तरी कुठे दिसलेले नाहीत.

वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करेल एवढंच काय ते बोलतात.माजी खासदार उन्मेष पाटील यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळेच त्यांचे देखील नाव शिवसेना उबाठा पक्षप्रवेशावेळी घेतले गेले मात्र त्यांनी त्याचे खंडण करत भाजपसोबत असल्याचे सांगितले. शिरीष चौधरी यांचे भाजपशी सख्य असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिरिषदादा चौधरी मित्र परिवाराच्या नावाने आपली वेगळी चूल मतदारसंघात मांडली असल्याने ते व त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात हेही गुलदस्त्यात आहे.

दुसरे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे देखील वेट अँड वॉच च्या भूमिकेत असून सध्या राजकारणापासून अलिप्त असून राजवड येथील निवासस्थानी शेतीत रममाण आहेत.मात्र "मै आया नही लाया गया हु" या त्यांच्या फेमस डायलॉग च्या अनुषंगाने त्यांच्या अमळनेर स्थित राजभवन निवासस्थानी लवकरच सक्रिय होणार असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. (latest marathi news)

Shirish Chaudhary, Sahebrao Patil
Loksabha Election 2024 : ‘महायुती’ आणि ‘मविआ’त तिढा कायम ; शिंदे गट नाशिकसाठी आक्रमक,ठाकरे गट-काँग्रेस उत्तर मुंबईसाठी आग्रही

माजी आमदार साहेबराव पाटील यांचे स्व.उदय वाघ यांच्याशी चांगले संबंध होते.पालिकेतील नगरसेवक अपात्रता प्रकरणात वाघांनी त्यांना मदत केली होती.तसेच बाजार समितीतील एका कार्यक्रमात कृषिभूषण यांचा तत्कालीन पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते भाजपत प्रवेश देखील केला होता.

मात्र ते आज कुठल्याही पक्षात सक्रिय दिसून येत नसून त्यांचे सर्वच पक्षाच्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. पारोळा तालुक्याशी त्यांची नाळ जुळली असल्याने कृषिभूषण साहेबराव पाटील हे करण पवार यांना मदत करतील की अमळनेर मतदारसंघाचा विचार करता स्मिता वाघ यांना मदत करतील हे अजून तरी त्यांनी सांगितले नसून त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.

अमळनेरात महायुती आणि महाआघाडी यांचा अजून कुठलाच मोठा मेळावा घेण्यात आलेला नसून कोण कुणाच्या व्यासपीठावर येणार याचे चित्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.

Shirish Chaudhary, Sahebrao Patil
Loksabha Election 2024 : भाजपचे ‘घर चलो अभियान’ ; दहा हजार कार्यकर्त्यांचा अडीच लाख मतदारांशी संवाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com