लॉकडाउन तरीही महिनाभरात २६९ जणांना कुत्र्यांचा चावा

लॉकडाउन तरीही महिनाभरात २६९ जणांना कुत्र्यांचा चावा
Dog bite
Dog bitesakal

जळगाव : शहरासह जिल्ह्यात तब्बल २६९ जणांना भटक्या कुत्र्यांनी (Dog bite cases) चावा घेऊन जखमी केले आहे. यावरून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासन व संबंधित पालिकांनी मोकाट कुत्र्यांचा उपद्रव थांबविण्यासाठी कठोर उपायांची गरज आहे. (jalgaon-corona-lockdown-last-month-dog-bite-cases)

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (Jalgaon medical collage and hospital) आपत्कालीन विभागांमध्ये मे महिन्यात २६९ नागरिकांनी कुत्रे चावल्यामुळे दाखल होऊन इंजेक्शन व उपचार घेतले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड हॉस्पिटल (Covid Hospital) म्हणून घोषित झालेले आहे. मात्र नेत्र कक्ष (सी १) येथे आपत्कालीन विभाग सुरू ठेवण्यात आलेला आहे. या ठिकाणी अपघात, हाणामारी, विषप्राशन व संबंधित रुग्ण प्राथमिक उपचार करण्यासाठी येतात. त्यासह भटक्या कुत्र्यांचा चावा यावरही उपचार घ्यायला येतात. जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे.

Dog bite
राष्ट्रवादीने मला साथ दिली..त्यामुळे मी कशाला पक्ष सोडू !

२५ बालकांचा समावेश

आपत्कालीन विभागांमध्ये मे महिन्यात एकूण २६९ व्यक्तींना कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. यात २०२ पुरुष, ४२ महिला, तर २५ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. महिन्याभरात सहा रुग्णांना उंदीर, मांजर, डुक्कर व अन्य प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.

..अशी घ्या काळजी

नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून सावध ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ व भरपूर पाण्याने जखम धुवून घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. आपत्कालीन विभागाला कक्ष क्रमांक सी एकमध्ये भेट द्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com