कोरोना, म्युकरमायकोसिससाठी टास्क फोर्स; ४० तज्ज्ञांची नियुक्ती

कोरोना, म्युकरमायकोसिससाठी टास्क फोर्स; ४० तज्ज्ञांची नियुक्ती
task force committee
task force committeetask force committee
Updated on: 

जळगाव : कोरोना व म्युकरमायकोसिसबाधित (mucormycosis) रुग्णांवर उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ यांना उपचाराबाबत मार्गदर्शनासाठी ४० तज्ज्ञांच्या टास्क फोर्सची पुर्नस्थापना करण्यात आली आहे. (jalgaon-coronavirus-mucormycosis-task-force-committee-select)

जिल्ह्यात सद्य:स्थितीत म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण आढळून येत असून, या रुग्णांसाठी उपचार व संभाव्य धोका असणाऱ्या रुग्णांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच करणे आवश्यक असल्याने हा फोर्स गठित केला आहे.

task force committee
जळगावात म्युकोरमायकोसिसची पहिली शस्त्रक्रिया; महिलेला जीवदान

असे असतील तज्ज्ञ

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या (Jalgaon collector abhijit raut) आदेशाने स्थापन केलेल्या या टास्क फोर्समध्ये जिल्ह्यातील दंतरोग, कान, नाक, घसातज्ज्ञ, नेत्ररोग, बालरोग, भूलतज्ज्ञ, अशा ४० तज्ज्ञांचा समावेश असेल. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय आयुर्वेदिक (Jalgaon medical collage and hospital) महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयातील तज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव हेही असतील.

याबाबत देतील सूचना

टास्क फोर्सचे सदस्य कोरोना व म्युकरमायकोसिसबाधित रुग्ण व क्रिटिकल असणाऱ्या रुग्णांसह इतर रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व पॅरामेडिकल स्टाफ यांना आवश्यक तो उपचार करण्यासाठी, कोरोनाबाधित रुगणांची संख्या व मृत्युदर कमी करण्यासाठी वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन करतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com