जॅकवेलच्या पाणीगळतीवर उपाययोजना होत नसल्यामुळे शेतकरी नाराज

kokan.jpg
kokan.jpg

रसायनी(रायगड) : जांभिवली येथील बामणोली धरणाच्या जँकवेल दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या अनास्थेमुळे रखडले आहे. यंदाच्या वर्षी दुबारा पिकाचा हंगाम संपल्यावर पाटबंधारे विभागाचे गळती रोखण्यासाठी जँकवेलचे काम सुरू होणार होते मात्र, सध्या काहीच हालचाली दिसत नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करत आहे. 

जांभिवली गावाच्या हद्दीत घेरा मणिकगडाच्या पायथ्याशी हे धरण 36 वर्षा पुर्वी बांधले आहे. धरणाच्या पाण्याचा जांभिवली, सवने, चावणे आदि गावातील ग्रामस्थांना पिण्यासाठी वापर होत नसला तरी या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचा मोठा आधार झाला आहे. खरीप हंगामातील भात पिकानंतर शेतकरी रब्बीच्या हंगामात भात पिका बरोबर भाजी पाल्याचे पिक घेऊ लागले आहे. सिंचनाचे खात्रीचे साधन मिळाल्याने जांभिवली परिसरात हरितक्रांती झाली आहे. बारामहिने जनावरांना हिरवा चारा मिळू लागल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यावसाय सुरू केला आहे.

साधारण सात आठ वर्षापासून जँकवेलमधुन आणि बांधातून एक दोन ठिकाणातून पाणी गळती होऊन भरपुर पाणी वाया जात आहे. तसेच जँकवेलची विहीर कमकुवत झाली आहे. कोसळण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहे. पाणी गळतीमुळे दर वर्षी धरण भरण्यास पावसाळयात उशीर लागत आहे तर, धरण भरलेल्या साठयांपैकी सुमारे पंधरा ते वीस टक्के पाणी गळतीतून वाया जात आहे. असे सांगण्यात आले आहे. दरम्यान, गळती थांबविण्याठी जँकवेलचे काम करण्यात यावे आशी मागणी शेतकरी सुरवातीपासुन करत आहे.


जॅकवेल मधुन होणारी पाणी गळती रोखणे महत्वाचे काम आहे. दुबारा पिकांचा हंगाम संपल्यानंतर जँकवेलचे अधुनिक पध्दतीने काम करण्याचे नियोजन होते. या कामासाठी निविदेनंतर आचारसंहितेमुळे पुढील कामकाज थांबले आहे. असे सुत्रातुन सांगण्यात आले आहे.  

''जँकवेल, बांधातून होणारी पाणी गळती रोखण्यासाठी दुरूस्तीचे काम करण्यात यावी अशी मागणी काही वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र पाटबंधारे विभाग खर्चाचा आरखडा बनवून कागदावर ठेवत आहे. दर वर्षी जँकवेल मधून गळती होऊन खुप पाणी वाया जात असल्याने लवकरात लवकर जँकवेलचे आणि इतर काम झाली पाहिजे.'' 
- धर्मराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते, कराडे बुद्रूक - जांभिवली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com