Road Accident : लग्न समारंभातून परतताना काळाचा घाला! सागरी महामार्गावर कारच्या धडकेत पाच वऱ्हाडी जखमी

या अपघातात (Road Accident) दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले.
Kumbharmath-Vengurla Sagari Mahamarg Road Accident
Kumbharmath-Vengurla Sagari Mahamarg Road Accidentesakal
Summary

कुडाळ-माड्याचीवाडी येथील काहीजण मोटारीने (एम. एच- ४३ एन- ७०५०) मालवणात लग्न समारंभासाठी (Wedding Ceremony) आले होते.

मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ-वेंगुर्ले सागरी महामार्गावर (Kumbharmath-Vengurla Sagari Mahamarg) काल सायंकाळी चारच्या सुमारास दोन मोटारींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले. त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात (Road Accident) दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असून या अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्या सर्व जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ-माड्याचीवाडी येथील काहीजण मोटारीने (एम. एच- ४३ एन- ७०५०) मालवणात लग्न समारंभासाठी (Wedding Ceremony) आले होते.

Kumbharmath-Vengurla Sagari Mahamarg Road Accident
Mumbai-Goa Highway : उड्डाणपुलाचे गर्डर हटवताना महामार्गाची एक लेन बंद होणार? प्रशासन महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

समारंभ आटोपून सायंकाळी ते पुन्हा कुडाळच्या दिशेने निघाल्यावर कुंभारमाठ-वेंगुर्ले सागरी महामार्गावर मोटार आली असता समोरून वेंगुर्लेहून श्रावणच्या दिशेन येत असलेली मोटार (एम. एच. ०२ डीएस ११०६) यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात घडला. या अपघातात दशरथ धोंडू तेली (वय ५५) व चंद्रशेखर मधुसूदन परब (५८ दोघे रा. माड्याचीवाडी, कुडाळ) हे तर दुसऱ्या गाडीतील सुनीता महेश पवार (५८), सिद्धेश महेश पवार (३३), सचिन गणपत पवार (३६, सर्व रा. श्रावण) हे तिघे असे एकूण पाचजण जखमी झाले.

या अपघातात दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले. अपघात घडल्याचे कळताच कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, माजी सभापती मधुकर चव्हाण, माजी उपसरपंच श्री. चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी सिद्धेश गावठे, ग्रामस्थ सुनील वस्त व अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करीत जखमींना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविले. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक बळीराम सुतार, हेडकाँस्टेबल धोंडू जानकर व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.

Kumbharmath-Vengurla Sagari Mahamarg Road Accident
'हिम्मत असेल तर सुवर्णसौधमधील वीर सावरकरांचा फोटो काढून दाखवा'; श्रीराम सेनेच्या मुतालिकांचं खर्गेंना आव्हान

जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यावर यातील तिघा जखमींना अधिक उपचारासाठी ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर एकाला कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com