उदय सामंत यांच्या भावाचा प्रशासनावर दबाव ; नीतेश राणेंचा आरोप

नीतेश राणे : नगरसेवकांच्या फोडाफोडीचाही आरोप
nitesh rane criticise on dipak kesarkar
nitesh rane criticise on dipak kesarkar
Updated on

कणकवली : सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे भाऊ जिल्‍हा प्रशासनावर दबाव आणत आहेत. कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत असा आरोप आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी आज केला.

येथे राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, ``सिंधुदुर्गात हप्ते वसुली सुरू केली आहे. पारंपरिक गरीब मच्छिमार आणि पर्ससीन नेटधारक यांच्याकडूनही पैसे घेतले जात आहेत. एलईडी आणि पर्ससीन मच्छीमारी देखील यांच्याच पाठबळावर सुरू असावी असाही आमचा संशय आहे. याबाबतची तक्रार मत्स्य खात्‍याचे मंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली होती; मात्र पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही.

जिल्‍हा परिषद सदस्य, नगरसेवक यांना आपल्‍या पक्षात घेण्यासाठीही पालकमंत्री आणि त्‍यांच्या भावाकडून लाखो रुपयांची उधळण केली जातेय. या दोहोंची सिंधुदुर्गात पैशाचा खेळ चालवला आहे. सिंधुदुर्गच्या राजकारणात नवा पायंडा पाडला जातोय. त्‍यामुळे पालकमंत्र्यांच्या भावाची ॲन्टी करप्शन आणि ईडी विभागामार्फत चौकशी होण्याबाबतची मागणी आम्‍ही करणार आहोत.

nitesh rane criticise on dipak kesarkar
मच्छिमारांवर ओढवली दुर्दैवी वेळ: मुलग्याला वाचविताना युवक बुडाला

ते म्हणाले, ``पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू यांना पुढची खासदारकी लढवायची आहे. यासाठी ते नगरसेवक, जिल्‍हा परिषद सदस्य यांची फोडाफोडी करत आहेत. त्याचबरोबरच खासदार विनायक राऊत आणि काही निष्‍ठावंत शिवसेना पदाधिकारी यांच्या विरोधातही कारस्थाने करत आहेत.`

सरपंचांच्या जीवापेक्षा फोडाफोडीला प्राधान्य

कोरोना संसर्ग रोखण्यात गावागावातील सरपंचांनी जिवाचे रान केले. अनेक सरपंचांची कुटुंबे, नातेवाईक कोरोना बाधित झाले. काही सरपंचांना जीव गमवावा लागला. जिल्ह्यातील सर्व सरपंचाचा विमा उतरविण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती; पण प्रत्‍यक्षात काहीही कार्यवाही झाली नाही. त्‍यांच्याकडे लोकप्रतिनिधी फोडण्यासाठी लाखो रूपये आहेत; पण सरपंचांना विमा उतरविण्यासाठी ते पैसे खर्च करू शकत नाहीत हे दुर्दैव असल्‍याचे श्री.राणे म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
Marathi News Esakal
www.esakal.com