‘ठाकर कला आंगण’चा
आज वर्धापन सोहळा

‘ठाकर कला आंगण’चा आज वर्धापन सोहळा

99937
भालचंद्र केळुसकर

‘ठाकर कला आंगण’चा
आज वर्धापन सोहळा
कुडाळ, ता. २ ः जिल्ह्यातील आदिवासी ठाकर जमातीच्या लोककलेचे जतन व प्रसार करणाऱ्या विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा १७ वा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. ३) पिंगुळी येथे होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ११ ते १ या वेळेत ठाकर समाजाचा वधू-वर सूचक मेळावा, सायंकाळी सातला मान्यवरांच्या उपस्थितीत उद्‍घाटन, त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणारा (कै.) शरद गरुड स्मृती पुरस्कार २०२३ ज्येष्ठ भजनी बुवा भालचंद्र केळुसकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. वर्धापन सोहळ्यानिमित्त संस्थेच्यावतीने यावर्षी कोकणामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांना ‘कोकणरत्न सन्मान २०२३’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच पिंगुळीचे नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार केला जाणार आहे. रात्री साडेआठला तेंडोलकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘पुण्यप्रभाव’ सादर होणार आहे. या कार्यक्रमास सर्व कलारसिक, प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com