

अजित पवार आज
संगमेश्वर दौऱ्यावर
चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी (ता. २७) रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची ते पाहणी करणार आहेत. रविवारी सकाळी त्यांचे कसबा येथे आगमन होईल. स्मारक जागेच्या नंतर त्यांचे सावर्डे येथे आगमन होईल. सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या सभागृहात दुपारी १२.३० वाजता ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात येत असल्याने आमदार शेखर निकम यांनी त्यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी केली आहे. सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले.
---
चिपळुणात पर्यावरण
संवर्धनाचा संदेश
चिपळूण : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त चिपळूण नगर पालिकेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी प्लास्टिकचे दुष्परिणाम सांगितले. या वेळी उपमुख्याधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, नगर अभियंता दीपक निंबाळकर, आरोग्य निरीक्षक महेश जाधव, मालमत्ता विभागप्रमुख सागर शेडगे, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, आरोग्य विभागप्रमुख वैभव निवाते कविता खंदारे लक्ष्मी देवळेकर यांच्यासह डेरवण येथील समर्थ नर्सिंग कॉलेजचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
---
मिरजोळी-पवारवाडीत
मोरी खचली
चिपळूण : मिरजोळी साईमंदिर ते श्री देवी महालक्ष्मी साळूबाई मंदिर अशा असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पवारवाडी परिसरातील मोरी खचली आहे. यामुळे मंदिराकडे जाणारा मार्ग बंद होण्याची भीती आहे. तसेच २ वर्षापूर्वी केलेला रस्ताही खराब झाला आहे. शहरापासून जवळच असणाऱ्या मिरजोळी अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. ३ वर्षांची मुदत संपण्याआधी त्याच त्याच रस्त्यांची कामे, आवश्यक नसलेल्या सरंक्षण भिंती, रेलिंग अशी कामे करून लोकप्रतिनिधी धन्यता मानत आहेत. तर ग्रामपंचायत गटारे, पाईपलाईन टाकण्यात मग्न आहे. कामे करताना जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीमधील विभाग व ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने कामांच्या दर्जाबाबत ग्रामस्थ शंका उपस्थित करत आहेत. असे असताना २ वर्षापूर्वी पवारवाडी परिसरात केलेला रस्ताही खराब झाला आहे.
---
सावर्डे बाजारपेठत
आंबा विक्री
सावर्डे ः देवगड हापूस व केशरी आंबा विक्रीस आला आहे; मात्र आब्यांचे दर सर्वसामान्याच्या आवाक्यात नसल्याने खरेदीस फारसा उत्साह जाणवत नाही. येथील मँगो स्टॉलमध्ये किरकोळ व घाऊक दरात आंबा विक्रीस आहे. आंबा ३०० ते नऊशे रुपये डझन असा विकला जात आहे. शेकडा तीन हजार रुपये दरानेही आंबा विकला जात आहे. स्थानिक ग्राहकांचा मात्र आंबा खरेदीस अल्प प्रतिसाद आहे. याबाबत विक्रेते जितेंद्र कोकाटे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, स्थानिक ग्राहक केवळ दराबाबत चौकशी करत आहे. खरेदीसाठी पुढे येत नाही. त्यामुळे हा आंबा मुंबई व पुणे या शहरात विक्रीसाठी पाठवला जातोय. शहरात दराबाबत फारशी घासाघीस होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.