

67313
शिरोडा मच्छीमार सोसायटीच्या
निवडणुकीत ‘हितवर्धक’ विजयी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ ः केरवाडा येथील शिरोडा मच्छीमार सहकारी सोसायटीची बारा जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी (ता. ३०) पार पडली. या निवडणुकीत मच्छीमार हितवर्धक सहकारी पॅनलने सर्व जागा जिंकून एकहाती विजय मिळविला. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अभिनंदन केले.
केरवाडा येथील शिरोडा मच्छीमार सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १२ जागांसाठी उमेदवार रिंगणात होते. यात मच्छीमार हितवर्धक सहकारी पॅनेलने १२ जागा जिंकून आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यात ३ जागा बिनविरोध निवडून आल्या, तर ९ जागांसाठी मतदान पार पडले. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, संजय धुरी, कृष्णा चोपडेकर आदी उपस्थित होते. मच्छीमार हितवर्धक सहकारी पॅनलचे काशिनाथ नार्वेकर, दिलीप नाईक, संजय उगवेकर, पुंडलिक कुबल, नारायण लोणे, दिगंबर तांडेल, आत्माराम साळगावकर, मयुरेश तारी, प्रकाश नार्वेकर, सारिका नाईक, शिल्पा चोपडेकर, अन्विता नार्वेकर आदी उमेदवार विजयी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.