IPL 2027 Auction : बेन स्टोक्ससाठी ३ संघ बक्कळ पैसा ओतणार, तिघांच्या खिशात ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम; कोण मारणार बाजी?

Which IPL team will buy Ben Stokes in 2027 auction? आयपीएल 2027 च्या मिनी ऑक्शनमध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स हा सर्वाधिक चर्चेत असलेल्या खेळाडूंपैकी एक ठरू शकतो. स्टोक्सने लिलावासाठी २ कोटी रुपये मूळ किंमत ठेवली आहे.
Ben Stokes in 2027 auction

Ben Stokes in 2027 auction

esakal

Updated on: 

Ben Stokes expected auction price in IPL 2027: इंग्लंडचा माजी कर्णधार बेन स्टोक्स याने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या मिनी ऑक्शनमध्ये नाव काय नोंदवलं, एकच धुरळा उडाला. २०२३ नंतर इंग्लंडचा माजी कर्णधार प्रथमच आयपीएल खेळणार आहे. आयपीएल २०२५ च्या लिलावात त्याने नोंदवलेलं नाव मागे घेतलं, तरीही त्याला आयपीएल २०२७च्या मिनी ऑक्शनमध्ये नाव नोंदवण्याची परवानगी दिली. आता बेन स्टोक्ससारखा ऑल राऊंडर कोणत्या संघाला नकोसा असेल आणि त्याच्यासाठी फ्रँचायझी बक्कळ पैसा ओतण्यासही तयार आहेत. पण, तीन फ्रँचायझी १६ डिसेंबरला गोवा येथे होणाऱ्या लिलावात बेन स्टोक्ससाठी आपल्या पर्समधील ४० कोटींपेक्षा जास्त शिल्लक रकमेचा मोठा वाटा खर्च करायला तयार आहेत.

Loading content, please wait...