IND vs ENG 2nd ODI: विराट कोहली दुसरी वन डे खेळणार, मग Playing XI बाहेर कोण बसणार? श्रेयस अय्यर की आणखी कोणी?

Virat Kohli Returns for Second ODI : भारतीय संघात दुसऱ्या वन डे संघात बदल होणार हे निश्चित आहे. विराट कोहली खेळणार असल्याचे शुभमन गिलने सांगितले.
Virat Kohli News
virat kohliesakal
Updated on

India Playing XI 2nd ODI: भारतीय संघाने पहिल्या वन डे सामना ४ विकेट्स व ६८ चेंडू राखून जिंकला आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. इंग्लंडच्या २४९ धावांच्या लक्ष्याचा टीम इंडियाने ३८.४ षटकांत सहज पाठलाग केला. उप कर्णधार शुभमन गिल ( ८७), श्रेयस अय्यर ( ५९) व अक्षर पटेल ( ५२) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहलीला (Virat Kohli) दुखापतीमुळे खेळता आले नव्हते, परंतु तो कटक येथे ९ तारखेला होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे. अशा परिस्थिती प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला बाहेर बसवले जाते, याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com