

IND vs NZ 2nd T20
esakal
IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना आज (२४ ऑक्टोबर) ख्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे.
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीला चांगली कामगिरी करत न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना लवकर माघारी पाठवलं. मात्र, त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि बेव्हन जॅकोब्स यांनी दमदार फलंदाजी करत न्यूझीलंडचा डाव सावरला.