Vaibhav Suryavanshi

बिहारच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमिअऱ लीग २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वेगवान शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम नावावर केला. त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूंत शतक झळकावले. आयपीएल २०२५ च्या लिलावात १३ वर्षीय वैभवला RR ने १.१ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. तेव्हा तो चर्चेत आला. त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध ५८ चेंडूंत शतक झळकावले होते. आशिया चषक ( १९ वर्षांखालील) स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचणाऱ्या संघाचा तो सदस्य होता आणि त्याने ४४ च्या सरासरीने १७६ धावा केल्या होत्या. रणधीर वर्मा स्पर्धा ( १९ वर्षांखालील) त्याच्या नावावर नाबाद ३३२ धावांचा विक्रम आहे.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com