India vs New Zealand 2nd T20I match time today
esakal
सुनंदन लेले ः सकाळ वृत्तसेवा
Where to watch India vs New Zealand 2nd T20I live? हरहुन्नरी वैभव सूर्यवंशीला कधी संधी मिळणार, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न सध्या चर्चिला जात असतो. आता या प्रश्नाची प्रतीक्षा संपली आहे. पहिल्या सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे इशान किशन उद्याच्या सामन्यात खेळणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीसाठी दरवाजे उघडले जातील. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना आज होत आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यादरम्यान किशनच्या उजव्या पायाच्या ‘ॲडक्टर’ स्नायूला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही हे स्पष्ट करण्यात आले, परिणामी वैभव सूर्यवंशीला अंतिम ११ जणांच्या संघात जागा मिळण्याची शक्यता अचानक निर्माण झाली आहे, मात्र सूर्यवंशी सलामीला येईल का तिसऱ्या क्रमांकावर खेळेल याची चर्चा चालू झाली आहे.