

IND VS NZ ODI SCHEDULE
esakal
IND VS NZ ODI SCHEDULE: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, जिथे सुरुवातीला ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज भारतीय संघाने ४ विकेट्सने आपल्या नावावर करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
परंतु सर्वांना उत्सुकता लागली आहे ती म्हणजे भारतीय संघाचे स्टार खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मैदानावर पाहण्याची. अशातच विराट कोहलीचा मैदानावर सराव करण्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जिथे विराट कोहली फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.