IND vs NZ T20: भारताविरुद्ध मालिकेआधी न्यूझीलंडला २ मोठे धक्के! दोन स्टार खेळाडू संघाबाहेर; टीम इंडियाला मिळणार फायदा?

IND vs NZ T20 Series: भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. मार्क चॅपमन आणि झॅक फॉल्क्स दुखापतीमुळे बाहेर झाले असून, त्यांच्या जागी जोश क्लार्कसन आणि ब्लेअर टिकनरला संधी मिळाली आहे.
IND vs NZ T20

IND vs NZ T20

esakal

Updated on: 

IND vs NZ T20 Series: भारतीय संघ २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जाणार असून, एकूण १२ सामने होणार आहेत. यामध्ये ५ टी-२०, ५ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांचा समावेश आहे.

मात्र, या मालिकेपूर्वी यजमान न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील दोन प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे टी-२० मालिकेत खेळू शकणार नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com