Shreyas Iyer towel video social media controversy
esakal
Shreyas Iyer hotel lobby video latest update: भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे आणि आज IND vs NZ 2nd T20I सामना रंगणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ही आघाडी दुप्पट करण्याची संधी भारताला आहे. पण, त्याआधी श्रेयस अय्यर एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. भारताचा कर्णधार टीम हॉटेलच्या लॉबिमध्ये टॉवेल गुंडाळून फिरताना दिसला आणि नेटकऱ्यांनी त्याची मजा घेतली. दरम्यान, त्याच्यासोबत तिलक वर्माही दिसतोय आणि हे दोघंही हॉटेल लिफ्टमध्ये जात असताना त्यात एक तरुणी दिसत असल्याने नेटकऱ्यांनी चर्चेचे बाण चालवण्यास सुरू केले.