BCCI Invites Applications for Five Positions on Junior Cricket Committee
esakal
How to apply for BCCI Junior Cricket Committee recruitment? भारतीय क्रिकेटमधील युवा स्टार्ससोबत काम करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. BCCIने आपल्या ज्युनिअर निवड समितीतील ५ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांवर २२ वर्षांखालील संघांची निवड करणे, कोचिंग कॅम्पचे आयोजन करणे आणि भारतातील तसेच परदेशातील विविध फॉरमॅटमधील देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारतीय ज्युनिअर संघांची निवड करणे, अशा जबाबदारी असतील. याशिवाय, भारताच्या ज्युनिअर संघांसाठी Talent pool आणि राखीव खेळाडू तयार करण्यात ही समिती महत्त्वाची भूमिका बजावेल.