WHO IS JINTIMANI KALITA?: कोण आहे जिंतिमणी कलिता? झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण, हरमनप्रीत कौरने दिली खास कॅप

JINTIMANI KALITA MAKES INDIA WOMEN DEBUT: आसामची क्रिकेटपटू जिंतिमणी कलिताने झिम्बाब्वेविरुद्ध भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. हरमनप्रीत कौरने तिला पदार्पणाची कॅप दिली.
WHO IS JINTIMANI KALITA?

WHO IS JINTIMANI KALITA?

esakal

Updated on: 

WHO IS JINTIMANI KALITA?: भारत आणि झिम्बाब्वे महिला संघांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील टी-२० मालिका भारतीय महिला संघाने ३-० ने जिंकली आहे. त्यानंतर शुक्रवार, २३ ऑक्टोबरपासून वनडे मालिकेला सुरुवात झाली आहे.

या मालिकेतील पहिला सामना वडोदरा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाकडून जिंतिमणि कलिताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com