

Hardik Pandya : हार्दिक पंड्याचे काय होणार? गुजरात सोडणार? मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा येणार? सायंकाळी पाच वाजता तो गुजरात संघात कायम राहिल्याचेही जाहीर करण्यात आले, परंतु त्यानंतर सर्व घडामोडी घडल्या आणि हार्दिक मुंबई इंडियन्स संघात गेला आहे. प्रथम मुंबईने 17.5 कोटी रुपये किंमत अललेल्या कॅमेरुन ग्रीनला बंगळूर संघात दिले आणि हीच रक्कम हार्दिकला गुजरात संघातून आपल्याकडे आणण्यास वापरली.
हार्दिक दोन सीझनसाठी जीटीसोबत होता आणि नंतर एमआयमध्ये परत आला. त्याने 2015 मध्ये मुंबईतून आयपीएल करिअरला सुरुवात केली. हार्दिकच्या एमआयमध्ये परतण्यामागे बरीच अटकळ आहे. मात्र, हार्दिकने स्वतःच्या इच्छेने मुंबई संघात गेला आहे असे जीटी क्रिकेटचे संचालक विक्रम सोळंकी यांनी म्हटले आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने आयपीएल 2022 मध्ये ट्रॉफी जिंकली होती. जीटीचा हा डेब्यू सीझन होता. त्याच वेळी हार्दिकच्या नेतृत्वाखाली जीटी 2023 मध्ये उपविजेते ठरले.
सोलंकी म्हणाले की, “गुजरात टायटन्सचा पहिला कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याने फ्रँचायझीला दोन हंगामात चमकदार कामगिरी करण्यास मदत केली. त्याच्या नेतृत्वाखाली, जीटीने आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि एकदाच अंतिम फेरी गाठली. त्याने आता आपल्या मूळ संघ मुंबई इंडियन्समध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. हार्दिकच्या जाण्यानंतर गुजरातने सलामीवीर शुभमन गिलला आगामी हंगामासाठी कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.