

French Open 2026
esakal
पॅरिस : चार वेळची फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम विजेती इगा स्विअतेक हिला आपल्या वाढदिवशी (ता. ३१) पराभवाचा धक्का बसला. युक्रेनच्या मार्ता कोस्तयुक हिने इगा स्विअतेक हिच्यावर सरळ दोन सेटमध्ये मात करीत फ्रेंच ओपन या प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅममध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.