विराट कोहलीने खूप लवकर निवृत्ती घेतली! Suresh Raina असं का म्हणतोय? किंग कोहलीने कालच्या मॅचमध्ये असं काय केलं?

Was Virat Kohli’s T20I Retirement Premature? टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने विराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलं आहे. रैनाच्या मते, कोहलीने खूप लवकर निवृत्ती घेतली, आणि तो २०२६ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपर्यंत सहज खेळू शकला असता.
Virat Kohli
Virat Kohli esakal
Updated on

विराट कोहलीला ( Virat Kohli) इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये चांगलाच सूर गवसला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १८व्या पर्वात जेतेपद जिंकून देण्यासाठी विराट जोर लावतोय. त्याने आयपीएल २०२५ मध्ये ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ३९२ धावांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्या धावांची सरासरी ( ६५.३३) ही इतरांपेक्षा चांगली आहे. काल राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ७० धावांची मॅच विनिंग खेळी केली. RCB ने हा सामना ११ धावांनी जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कूच केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com