

Hardik Pandya and Shreyas Iyer Debate Continues
esakal
Ravi Shastri Picks Sanju Samson for Captaincy: भारतीय कर्णधारांच्या यशस्वी यादीमध्ये पाहिलं तर सूर्यकुमार यादवचं (Suryakumar Yadav) नाव देखील घेतलं जातं. सूर्याने नुकताच झालेला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून दिलं. भारताला विश्वविजेता बनून जवळपास तीन महिने झाले आहेत. परंतु आता चिंता व्यक्त केली जात आहे ती म्हणजे सूर्याच्या फलंदाजीची. सूर्या सध्या फॉर्ममध्ये नाहीये. त्याच्या फलंदाजीतील घसरणीमुळे निवड समिती त्याच्या जागी आता दुसऱ्या खेळाडूला कर्णधारपद देण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. फलंदाजीत त्याचा फॉर्म आता चिंतेचा विषय बनत चालला आहे.