AFG vs NZ : न्यूझीलंडने अवघ्या 1 धावेत गमावल्या 3 विकेट्स तरी अफगाणिस्तान...

New Zealand Vs Afghanistan
New Zealand Vs Afghanistan esakal
Updated on

New Zealand Vs Afghanistan : वर्ल्डकप 2023 मध्ये आज अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सामना रंगला. तगडी फिरकी असलेला अफगाणिस्तान इंग्लंडप्रमाणे न्यूझीलंडला देखील झटका देणार असा अंदाज होता. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला सुरूवातीला तसे झटके दिलेही.

मात्र त्यांचा डाव कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांनी हाणून पाडला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या 144 धावांच्या दमदार भागीदारीमुळे न्यूझीलंडने 4 बाद 110 धावांवरून 6 बाद 288 धावांपर्यंत मजल मारली.

New Zealand Vs Afghanistan
IND vs BAN Playing 11 : नो रोटेशन! बॉलिंग कोचने थेटच सांगितलं, दोन अनुभवी खेळाडू बेंचवरच बसणार?

चेन्नईच्या टर्निंग ट्रॅकवर अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सीएसकेकडून खेळणारा सलामीवीर डेवॉन कॉनवेला मुजीबने 20 धावांवर बाद करत पहिला धक्का देखील दिला.

मात्र त्यानंतर विल यंग आणि रचिन रविंद्र यांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी रचून संघाला 20 व्या षटकापर्यंत शतकी मजल मारून दिली. यात विल यंगच्या 54 धावांचा वाटा मोठा होता.

अखेर ही जोडी अजमतुल्लाने फोडली. त्याने रचिनचा 32 धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर त्याच षटकात शेवटच्या चेंडूवर 54 धावा करणाऱ्या यंगला देखील बाद करत किवींचे दोन्ही सेट झालेले फलंदाज माघारी धाडले. यानंतर राशिद खानने पुढच्याच षटकात डॅरेल मिचेलला बाद करत न्यूझीलंडची अवस्था 1 बाद 109 धावांवरून 4 बाद 110 धावा अशी केली.

New Zealand Vs Afghanistan
IND vs BAN : भारत - बांगलादेश सामन्यावेळी ढग दाटणार... पुण्यातील हवामान कसं असणार?

अवघ्या 1 धावेत न्यूझीलंडने तीन फलंदाज गमावल्यानंतर अफगाणिस्तान सामन्यावर पकड मजबूत करेल असे वाटले होते. मात्र कर्णधार टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स यांनी पाचव्या विकेटसाठी 144 धावांची खणखणीत भागीदारी रचली. अखेर नवीन उल हकने 48 व्या षटकात फिलिप्लला 71 तर लॅथमला 68 धावांवर बाद करत एकाच षटकात दोन धक्के दिले. अखेर मार्क चॅपमनने 12 चेंडूत 25 धावा करत न्यूझीलंडला 50 षटकात 6 बाद 288 धावांपर्यंत पोहचवले.

अफगाणिस्तानकडून अझमतुल्ला ओमरजाई आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com