

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : विबग्योर हायस्कूल येरवडा संघाने स्कुलिंपिक्स क्रिकेट स्पर्धेत धावांचा यशस्वी पाठलाग करत विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलचा आठ विकेट राखून पराभव केला. अयमान जरीया याने अष्टपैलू खेळी करत विबग्योर संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. अयमानने दोन विकेट आणि नाबाद १९ धावा अशी कामगिरी केली.
या स्पर्धेत आदल्यादिवसाच्या पावसामुळे सहकारनगर येथील शाहू कॉलेजच्या मैदानावरील सनराइज क्रिकेट अॅकॅडमीवर सामने होऊ शकले नाहीत. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी लढती सुरु झाल्या.
संक्षिप्त धावफलक :
विद्यावर्धिनी स्कूल : १० षटकांत ९ बाद ६७ (प्रथम शिंदे २२, आलोक अलगुडे २१, दिव्यम मोरे २-७, अयमान जरीया २-१८) आठ विकेटनी पराभूत विरुद्ध विबग्योर हायस्कूल , येरवडा : ६.२ षटकांत २ बाद ६८ (अयमान जरीया नाबाद १९, हर्ष भट्टाचार्य नाबाद ९, यश जगलेर १-१८)
सामनावीर : अयमान जरीया
जयवंत पब्लिक स्कूल , सणसवाडी : १० षटकांत २ बाद ९३ (हर्षवर्धन जगताप ४३, ओम सूर्यवंशी ३७, आझाद तांबवड १-१४) २३ धावांनी विजयी विरुद्ध एसएनबीपी स्कूल, चिखली : १० षटकांत ९ बाद ७० (दर्श पटेल १३, आदित्य पाटील १२, श्रीवर्धन दरेकर २-२४, हर्षवर्धन जगताप १-७, विराज दरेकर १-१०)
सामनावीर : हर्षवर्धन जगताप
एसएसपीएम डे स्कूल : १० षटकांत ३ बाद १०१ (काव्य तामचिकर २८, स्वराज यादव नाबाद २७, शर्वन उतेकर २०, विन्सेंट पॉल १-१४) ५० धावांनी विजयी विरुद्ध मार इव्हानीओस कॉन्व्हेंट, पिंपळे गुरव : १० षटकांत ४ बाद ५१ (रुद्रांश फंड २५, रूद्र चुटके नाबाद ७, श्रेयस क्षीरसागर २-१०, वीर कागदे १-५)
सामनावीर : स्वराज यादव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.