Summer Refreshing Drinks
Summer Refreshing DrinksSakal

Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात कोल्ड्रिंक हानिकारकच, घरगुती पेय घेण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

Summer Refreshing Drinks: उन्हाळ्यात बाहेरचे कोल्ड्रिंक पिण्याएवजी घरीच बनवलेल्या पौष्टिक शीतपेयांचे सेवन करावे.

उन्हाचा पारा वाढला की, थंड पदार्थांच्या सेवनाकडे सर्वांचा कल वाढतो. यात कोल्ड्रिंकचा देखील समावेश आहे. परंतु, हे शरीरासाठी हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे उन्हाळ्यात कोल्ड्रिंकऐवजी घरी बनविलेल्या शीतपेयांचे प्राशन करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

सध्या ऊन चांगलेच तापत आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंडपेयांचा सहारा घेतात. काहीवेळा बाहेर मिळणाऱ्या लिंबू सरबत, उसाचा रस, लस्सी, ताक आणि कोल्ड्रिंक याचे प्राशन केले जाते. परंतु, बर्फ वापरण्यात आलेला लिंबू सरबत, ताक, उसाचा रस हानिकारक आहे. उसाच्या रसाचे प्राशन करतानादेखील ऊस हा सावलीत ठेवलेला असावा व स्वच्छ धुतलेला असावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. शक्यतो लस्सी, ताक लिंबू सरबतहीदेखील घरी बनवलेले असावे.

यकृत, हृदयावर परिणाम

कोल्ड्रिंकमध्ये साखर आणि कॅलरीज जास्त असते. यामुळे यकृत आणि हृदयावर परिणाम होतो. इन्सुलिनही वाढते. विशेष म्हणजे त्यात शरीरासाठी हेल्दी असे काहीच नसते. त्यामुळे लहान मुलांना तर कोल्ड्रिंक अजिबात द्यायला नको. यासह सोडा, गोटी सोडा, चहा, कॉफी याचेही प्राशन करू नये.

घरी बनवलेली लस्सी, ताक, पन्हे उत्तम

उन्हाळ्यात नारळ पाणी, घरी बनवलेले ताजे ताक, लस्सी, मसाला ताक, कैरीचे पन्हे, लिंबू सरबत, पुदिना सरबत, बेल सरबत, गुलाब सरबत, सब्जा बी, काकडी, गुलकंद सरबत यांचे प्राशन करावे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

Summer Refreshing Drinks
Summer Drinks For Diabetes: 'ही' 5 थंड पेय उन्हापासून देतील थंडावा अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

उन्हाळ्यात कोल्ड्रिंकचे प्राशन अजिबात करू नये. त्याचे शरिरावर विपरीत परिणाम होतात. यासह चहा, कॉफी, सोडाही घेऊ नये. या दिवसांत शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांची गरज असते. त्यामुळे विविध सरबतांमध्ये ‘सब्जा बी’चा वापर करू शकता. यासह घरी बनवलेली ताजी लस्सी, ताक, कैरीचे पन्हे, बेल, पुदिना, गुलकंद, काकडी सरबतदेखील घेऊ शकता. याने शरीराला थंडावा मिळतो.

— राजश्री अग्रवाल, आहारतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com