भीमा कोरेगाव प्रकरणी उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह ५ पक्षप्रमुखांना समन्स

Bhima Koregaon case Summons to 5 party leaders including CM Uddhav Thackeray MNS Raj Thackeray
Bhima Koregaon case Summons to 5 party leaders including CM Uddhav Thackeray MNS Raj Thackeray

भीमा कोरेगाव प्रकरणी आयोगाचे काम सुरू आहे, दरम्यान या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह प्रमुख पाच पक्षांच्या पक्षप्रमुखांना आयोगाकडून समन्स पाठवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेना, मनसे, वंचित बहुजन आघाडी, आणि रिपब्लिकन आठवले गट यांच्या पक्षांच्या प्रमुखांना हा समन्स पाठवणयात आला आहे, या प्रकरणी आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, त्याबद्दल ३० जून पर्यंत याबाबत म्हणणे सादर करावे लागणार आहे.

Bhima Koregaon case Summons to 5 party leaders including CM Uddhav Thackeray MNS Raj Thackeray
तर काश्मीरात जाऊन हनुमान चालिसा म्हणा; CM ठाकरेंचा राणा दाम्पत्याला टोला

राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांते भीमा कोरेगाव प्रकरणात म्हणणे जाणून घेण्यासाठी हा समन्स बजावण्यात आलेला आहे. यामध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे अध्यक्ष राज ठाकरे, कांग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि रिपब्लिकन आठवले गटाचे रामदास आठवले यांना आयोगाने समन्स बाजावला आहे. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साक्ष याआधी नोंदवण्यात आली आहे.

Bhima Koregaon case Summons to 5 party leaders including CM Uddhav Thackeray MNS Raj Thackeray
देशमुख, मलिकांच्या मतदानाचं काय?अधिवक्त्यांनी कोर्टात मांडला महत्वाचा मुद्दा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com