

"Major weather change during Diwali; Hint of cold in North India."
Sakal
दिवाळी तोंडावर आलेली असतानाच देशभरातील वातावरणात एकाच वेळी दोन परस्परविरोधी प्रवाह सक्रिय झाले आहेत. शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी उत्तर आणि मध्य भारतात किमान तापमानात वेगाने घसरण होऊन रात्रीच्या गारव्यात वाढ होणार आहे, तर दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.