Ajit Pawar : "... ही राष्ट्रवादीची शिवसेना!" जयंत पाटलांना सावरायला अजित पवार सरसावले

'राष्ट्रवादीची शिवसेना', जयंत पाटलांच्या व्यक्तव्याची अजित पवारांकडून सारवासारव
Ajit Pawar
Ajit PawarEsakal

शिवसेनेत फूट पडून शिंदे गट आणि ठाकरे गट निर्माण झाला. त्यानंतर बंडखोर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोक्यावर खापर फोडत उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवली आहे, असा आरोपही शिंदे समर्थक आमदारांकडून वारंवार करण्यात येतो. ठाकरे गटाचे नेते हे आरोप वारंवार फेटाळतात. पण पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याने हे मान्य केले. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे.

यावर बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटलांच्या व्यक्तव्याची सारवासारव केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ठाकरे गटाची शिवसेना ही राष्ट्रवादीची शिवसेना असल्याचं जयंत पाटीलांनी गमतीने म्हटलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मराठी लोकांकरिता काढलेली संघटना आहे. ती सर्वदूरपर्यंत महाराष्ट्राभरात पोहचली आहे. त्यांची धोरणं, विचार बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वदूर पोहचवले आहेत. ती शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना संघटनेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं आहे. तसंच युवासेनेचं नेतृत्व आदित्य ठाकरे करतात, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Koyta Gang: हिवाळी अधिवेशनात Ajit Pawar यांनी मांडलेल्या कोयता गँगची खरंच दहशत आहे?

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा काही वेगळा अर्थ काढू नका. त्यांचा तसा अजिबात म्हणण्याचा हेतू नसेल. कारण माझी, त्यांची भेट नाही. परंतु, त्यांना याबद्दल काय वाटतं. ते आणि आम्ही बघू, असंही अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar : 'मी दूधखुळा नाही, मला शिकवू नका', शरद पवारांबद्दलच्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच भडकले

काय म्हणाले होते जयंत पाटील?

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यादरम्यान झालेल्या संवादाचा एक व्हिडिओ व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पत्रकार परिषदेत जयंत पाटील भास्कर जाधवांना म्हणतात.आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना, त्यावर भास्कर जाधव हसतात आणि होकार देतात. त्या वक्तव्याचा पुनरुच्चारही करतात. मनसे नेते संतोष धुरी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवलेली शिवसेना, आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेना.. पोटातलं ओठावर आलंच, असे म्हणत धुरी यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com